दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय?
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
१८.१२.२०२५शासन निर्णय - दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक समावेशनासाठी शासनामार्फत दिव्यांग-अव्यंग किंवा दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे दिनांक १८.१२.२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.